एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा, म्हणाले...

रत्नागिरी: विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी अजूनही संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित झालेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फही केलं जाऊ शकतं, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री आणि पालकमंत्री यांनी दिला. राज्याचे परिवहन मंत्री आणि पालकमंत्री अनिल परब सध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आणि निलंबित कर्मचारी याबाबत महत्वाची माहिती दिली. एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फही केलं जाऊ शकतं, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला. सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, परब ज्या शासकीय विश्रामगृहावर मुक्कामाला आहेत, तेथून जवळच शंभर मीटर अंतरावर एसटी आंदोलक आहेत. म्हणून अधिक खबरदारी म्हणून परब यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर एसटी संप सुरू आहे. आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. अडीच हजारांपेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. प्रशासन कारवाईचे एकेक पाऊल पुढे टाकत आहे. जे निलंबित झालेत त्यांची बडतर्फी होऊ शकते. सरकारला अशी कारवाई करण्याची अजिबातच इच्छा नाहीये. परंतु लोकांना वेठीला धरून अत्यावश्यक सेवा वेठीला धरली जात असेल, तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ते वापरावे लागतील, असं परब यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार की नवी नोकर भरती करणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर या संदर्भात बैठक व्हायची आहे. त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. एसटीच्या सेवेत आतापर्यंत २२ हजार कर्मचारी परत आले आहेत. एसटीची १२५ डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बऱ्यापैकी वाहतूक सुरू आहे. तर विदर्भ मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. २० तारखेनंतर हळूहळू वाहतूक सुरू होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3DYH8IH
https://ift.tt/32a07D2

No comments

Powered by Blogger.