सिंधुदुर्गातील पर्यटनाला पुन्हा झळाली; समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलली

सिंधुदुर्ग: सलगच्या सुट्ट्या तसेच नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी देशभरातील विविध राज्यांतील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे तळ कोकणातील सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची जास्त पसंती ही सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांना असल्याचे दिसतेय. तळ कोकणातील जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मालवण, दांडी, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला व शिरोडा या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. तसेच मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत. समुद्र पर्यटनाचा आनंद पर्यटक लूटत आहेत. येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. बनाना राईड, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंगचा आनंद पर्यटक लुटत असून, व्यवसायही तेजीत आहे. म्हटले की, खाद्य संस्कृती. सध्या येणारे पर्यटक मासळीचा आस्वाद हॉटेलमध्ये जाऊन लुटत आहेत. सध्या मांसाहाराबरोबर कोकणातील शाकाहारी खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने पर्यटन व्यावसायाला झळाली मिळाली आहे. रायगडातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. डिसेंबरचा अखेरचा आठवडा असल्याने सुट्ट्यांचा हंगाम आहे. अशात आता पर्यटकांची पावले रायगडमधील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणांवर पर्यटक आले आहेत. बहुतांश पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि माथेरान या पर्यटन स्थळी पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. किनारे गजबजून गेले आहेत. २४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२२ पर्यंत या पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स हे आरक्षित झाले आहेत.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3sOSA83
https://ift.tt/3yWXy3i

No comments

Powered by Blogger.