रत्नागिरीतून 'तो' संशयास्पद ट्रक सिंधुदुर्गात जात होता, त्याचवेळी चेक पोस्टवर...

खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथे वनविभागाने धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला खारेपाटण तपासणी नाक्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवून तो ताब्यात घेतला. या प्रकरणी दोघांवर वनविभागाने गुन्ह्याची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील येथून हा ट्रक अवैधरित्या खैर लाकूड घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे येत होता. हा ट्रक खारेपाटण तपासणी नाक्यावर आला असता, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ट्रक अडवला. त्यावेळी या ट्रकमधून खैर या लाकडाची बेकायदा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. अवैधपणे खैर लाकडाची वाहतूक आणि पासमध्ये दाखवलेल्या मालाच्या नोंदीपेक्षा जास्त घनमीटर माल ट्रकमध्ये आढळून आला. या प्रकरणी वनविभागाने दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कणकवली वनक्षेत्रपाल घुनकीकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पासमध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर दिसून आलेला नाही. त्यामुळे खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने ताब्यात घेतला. तो पुढील चौकशीसाठी फोंडा विक्री आगार वनपरिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येत आहे, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3ENTEvS
https://ift.tt/3oKfueh
No comments