नारायण राणेंचा नरबळी देण्याचा प्रयत्न फसला; विनायक राऊतांची जळजळीत टीका

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी 'राजकीय नरबळी' देण्याचा यांचा प्रयत्न फसला, अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाविकासआघाडी समोर आपला निभाव लागणार नाही, ही गोष्ट नारायण राणे यांना समजली होती. त्यामुळेच नारायण राणे () २०१४ पूर्वी त्यांची जशी ख्याती होती, तसे वागायला लागले. प्रत्येक निवडणुकीला एक नरबळी द्यायचा, ही नारायण राणे यांची पद्धत होती. यावेळीही संजय परब यांच्यावर हल्ला करुन तसा प्रयत्न झाल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले. संतोष परब हल्लाप्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यंदा प्रचंड गाजत आहे. जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी राणे कुटुंबीयांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर ९८१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा समावेश आहे. २००८ पासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे गटाचे वर्चस्व होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्हा बँकेत सत्तांतर झाले होते. त्यामुळे आता नारायण राणे यांना काही करुन जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा हस्तगत करायची आहे. सध्या जिल्हा बँकेत काँग्रेसचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, शिवसेना २ आणि प्रत्येकी एका जागेवर भाजप व अपक्ष सदस्य आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी पुरस्कृत समृद्धी सहकार पॅनल आणि नारायण राणे यांचे सिद्धिविनायक पॅनल यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान, सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये प्रचारात सहभागी होता आले नव्हते. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने गुरुवारी त्यांना मतदानाचा हक्कही नाकारला. आता शुक्रवारी या मतमोजणीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3qAAeoj
https://ift.tt/3mLjPfP
No comments