Ratnagiri : चिपळूणमध्ये भयंकर आणि विचित्र अपघात; दुचाकीवर चालकाच्या पाठीमागे बसलेले आजोबा...
रत्नागिरी: जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात भयंकर आणि विचित्र झाला. मिरजोळी ते विजापूर-गुहागर रस्त्यावर दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात ८३ वर्षीय झाला. या प्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मिरजोळी-विजापूर-गुहागर रस्त्यावर साईमंदिरनजीक काल, गुरुवारी दुपारी दोन दुचाकींमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. याबाबत काल रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. या अपघातात गुहागरच्या वडद सुतारवाडी येथील ८३ वर्षीय रामचंद्र शंकर पिंपळकर यांचा मृत्यू झाला. पिंपळकर हे दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसले होते. दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, जैद लियाकत कोलथरकर हे दुचाकीवरून मिरजोळी गाव ते विजापूर रस्त्यावरून जात होते. साईमंदिर येथे ते आले असता, दुसऱ्या एका दुचाकीवरून येणारे प्रतीक प्रकाश पिंपळकर (वय ३०, सती भाग्योदय नगर, चिपळूण) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर प्रतीकच्या पाठीमागे बसलेले रामचंद्र पिंपळकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आरमाळकर करत आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3GSj4cs
https://ift.tt/3p3YFev
No comments