रत्नागिरीतल्या शाळा १ फेब्रुवारीपासून

रत्नागिरी: करोनाच्या तिसऱ्या लाटेत कोकणात जिल्हयात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता १ फेब्रुवारीपासून या शाळा सुरु करण्यास जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांनी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्हयात गेले काही दिवस पुन्हा बंद करण्यात आलेल्या शाळांची घंटा पुन्हा घणघणणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. शाळेमध्ये गर्दी होणार नाही तसेच शारिरीक अंतर, मास्क आणि स्वच्छता या कोरोनाच्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी दिली आहे. शाळेमध्ये गर्दी होणार नाही तसेच शारिरीक अंतर, मास्क आणि स्वच्छता या करोनाच्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील २० जानेवारी २०२२ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार करोनाचा वाढता प्रार्दुभाव सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी करोनाचा कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. करोनाचा संसर्ग कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. शासनाच्या २९ नोव्हेंबर २०२१ अन्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन करुन राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी चे वर्ग शाळा सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील ९० टक्के शाळांच्या व्यवस्थापन समितींनी मान्यता दिल्याने याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचेशी चर्चा करुन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावी चे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येतील अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://bit.ly/3rTSIAU
https://bit.ly/3KT2CeC
No comments