वीजबिल वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण; मोबाईल काढून घेत ग्राहकांची धक्काबुक्की

रत्नागिरी: कोकणात जिल्हयातही वीजबील वसुलीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षे असलेला कोरोना, नैसर्गिक आपत्ती त्यामुळे अनेकांना आर्थिक समस्येला तोंड दयावे लागत आहे. मात्र दुर्देवाने वसुलीसाठी जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्याच अंगावर थेट हात उचलून गैरवर्तन करणे असे प्रकार घडू लागले आहेत. अशीच मारहाणीची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील तुळसवडे माणिक चौकवाडी येथे घडली आहे. ग्राहकाचे थकलेले विज बिल वसुलीसाठी गेलेल्या विद्युत सहाय्यक कर्मचाऱ्यालाच चक्क दोघांकडून मारहाण झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. (An employee who was going to collect was beaten by customers) रितेश शांताराम वेलवंडे (२५, कुळेवाशी, संगमेश्वर, सध्या रा. सौंदळ, राजापूर), असे मारहाण झालेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी २२ जानेवारी रोजी दुपारी तीन च्या दरम्यान संजय पद्मराज कपाळे, शीतल संजय कपाळे (दोन्ही रा. तुळसवडे, माणिकचौक राजापूर) यांच्या घरी व्यावसायिक वीज बिल वसुलीसाठी गेले होते. बिल थकीत असल्याने ते कनेक्शन कट करत असताना संजय व शीतल कपाळे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर त्यांना काठीने ढकलून दिले. संशयित संजय कपाळे व शीतल कपाळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कर्मचारी वेलवंडे यांचे दुसरे सहकारी रामचंद्र हातकणकर या घटनेचा व्हिडीओ करत असताना त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. क्लिक करा आणि वाचा- याबाबतची फिर्याद रितेश वेलवंडे यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली आहे. त्यानुसार संशयित पती-पत्नी संजय व शीतल यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी भादवि ३५३,३९२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3rGhTXu
https://ift.tt/340Gmyq

No comments

Powered by Blogger.