LIVE: कोकणातील नगरपंचायत निवडणुकीत मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, थोड्याचवेळात निकाल

मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. यामध्ये दापोली, मंडणगड नगरपंचायत, ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत आणि रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व जागांवर विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. LIVE Updates:* वैभववाडीत शिवसेनेच्या श्रद्धा रावराणे विजयी; नारायण राणे आणि वैभव नाईकांमध्ये काँटे की टक्कर* दापोली नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय* कुडाळ नगरपंचायतीत शिवसेनेनं विजयाचं खातं उघडलं, श्रुती वर्दम विजयी * दापोलीत मविआची आघाडी, योगेश कदम, सूर्यकांत दळवी यांची प्रतिष्ठा पणाला* मंडणगडमध्ये रामदास कदम आणि संजय कदम राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठापणाला*माणगाव नगरपंचायतमध्ये सुनिल तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावलेंची प्रतिष्ठा पणाला * नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, एक ते दीड तास निकाल स्पष्ट होण्याची शक्यता* कोकणात पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात नगरपंचायत निवडणुकांच्यानिमित्ताने पुन्हा एकदा महाविकासआघाडी विरुद्ध राणे कुटुंबीय असा सामना रंगणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. या चार नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक झाली होती. देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात आहे. कुडाळची मोजणी कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे आहे. सकाळी दहा ते साडेदहा वाजता मोजणी सुरू होईल. अवघ्या दीड-दोन तासात कौल स्पष्ट होणार आहे. * दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी दापोलीतील रामदास कदम समर्थकांची शिवसेनेने पदांवरुन उचलबांगडी केली होती. तर निवडणुकीची सूत्रे सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे रामदास कदम समर्थकांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीमध्ये काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. * शहापूर नगपंचायतीमधील पक्षीय बलाबल सध्या सत्ता कुणाची - शिवसेना पक्षीय बलाबल - शिवसेना 10, राष्ट्रवादी 3, भाजप 3, अपक्ष 1 (यापैकी 2 भाजप नगरसेवक आणि 1 अपक्ष नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश) या निवडणुकीतील एकूण रिंगणातील उमेदवार - शिवसेना 17, भाजप 17, राष्ट्रवादी काँग्रेस 8, काँग्रेस 2, मार्क्सवादी कमुनिस्ट 1, अपक्ष 1 मुख्य लढत - शिवसेना विरुद्ध भाजप कोणत्या प्रमुख नेत्याची प्रतिष्ठा पणाला - शिवसेनेचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे पंचायत राज्य केंद्रीयमंत्री आणि भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील. * रायगडच्या सहा नगरपंचायतींमध्ये २१ जागांसाठी ७८.०९% मतदान रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या २१ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे पाली ८५.८७% खालापुर ७६.४९% तळा ७५.२६% म्हसळा ६९.४९% पोलादपुर ८६.२७% माणगाव ७५.३७% एकुण ७८.०९%
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3Aah112
https://ift.tt/3FKb38i
No comments