Nitesh Rane : नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी केली चौकशी; जवळपास एक तास ते...

सिंधुदुर्ग: शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार यांची आज, सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. नितेश राणे () हे आपल्या वकिलांसोबत पोलीस ठाण्यात हजर झाले होते. राणे यांची जवळपास एक तास चौकशी झाल्याची माहिती समजते. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. मात्र, अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. आता संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आज, सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे वकील संग्राम देसाई हे देखील उपस्थित होते. कणकवली पोलिसांनी जवळपास एक तास राणे यांची चौकशी केल्याचे समजते. याबाबत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन उजळेकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, हा एक तपासाचा भाग आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात तपास अद्याप सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, कुठल्या मुद्द्यावर चौकशी झाली, याचा सविस्तर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3IxdtJj
https://ift.tt/32wzdG0
No comments