Nitesh Rane: नितेश राणे अखेर अज्ञातवासातून बाहेर; थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रकटले

सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणामुळे गोत्यात आलेले भाजप आमदार अखेर गुरुवारी सर्वांसमोर आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ते थेट बँकेत प्रकट झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या मनिष दळवी आणि अतुल काळसेकर या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ जानेवारीला होणार आहे. तोपर्यंत नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. तसेच सोमवारी नितेश राणे यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल १५ दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे नितेश राणे सर्वांसमोर आल्याची चर्चा आहे. यावेळी प्रसारमाध्यांनी नितेश राणे यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण १७ तारखेनंतर बोलणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. १९ तारखेला जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आहेत. त्यावेळी जल्लोष करु, असेही त्यांनी सांगितले. नितेश राणेंच्या जामिनाचा निकाल १७ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे () आणि संदेश सावंत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई हायकोर्टातील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता न्यायमू्ती चंद्रकांत भडंग हे या प्रकरणात सोमवारी निकाल देणार आहेत. दरम्यान, निकाल येईपर्यंत नितेश राणे आणि संदेश सावंत यांना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम असणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि त्यांचे साथीदार संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, नितेश राणे यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला. या अर्जावर बुधवारी झालेल्या सुनावणीत नितेश राणे यांनी वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर मी म्याव म्याव असा आवाज काढल्याने सत्ताधाऱ्यांना त्यांचा अपमान झाला असे वाटले. त्याचा सूड घेण्याच्या उद्देशानेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या धामधुमीत मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आणि संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांच्या गुन्ह्यात मला गोवण्यात आले, असे नितेश राणे यांनी वकिलांमार्फत मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला होता. त्याचवेळी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत आणि निकाल येईपर्यंत त्यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही कणकवली पोलिसांकडून मुंबई हायकोर्टात देण्यात आली होती. सुनावणी अपूर्ण राहिल्याने आज, गुरुवारीही मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबत न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग हे सोमवारी निकाल देणार आहेत. दरम्यान, निकाल येईपर्यंत नितेश राणे आणि संदेश सावंत यांना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम राहणार आहे.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3qms2sP
https://ift.tt/3r8BNtO
No comments