ST Strike: संपाचा तिढा सुटेना, एसटी कर्मचारी आता नारायण राणेंच्या भेटीला

कणकवली: गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली. नारायण राणे कणकवलीत आले असताना ही भेट झाली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे नारायण राणे यांच्यासमोर मांडले. नारायण राणे () यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या () समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर तुमच्या मागण्यांना माझा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे आता नारायण राणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी काही पाऊल उचलणार का, हे पाहावे लागेल. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही एसटी संपाचा तिढा अजून सुटू शकलेला नाही. दरम्यानच्या काळात राज्य सरकार आणि आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली होती. तसेच कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळेल, याची हमीही घेतली होती. यानंतर काही एसटी कर्मचारी संघटनांनी संपातून माघार घेतली होती. परंतु, बहुतांश एसटी कर्मचारी अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत. हे कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. संपाचा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. यानंतर बहुतांश एसटी संघटनांनी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आवाहन केले होते. परंतु, आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या संपकऱ्यांनी या आवाहनाला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे अजूनही संप सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नारायण राणेंची कणकवली तहसील कार्यालयाला सदिच्छा भेट केंद्रीय मंत्री नारायण राणे हे केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच कणकवली तहसीलदार कार्यालयात सदिच्छा भेट दिली. कणकवली तहसीलदार कार्यालयात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात एक दस्त नोंदणी करण्या करता राणे तहसीलदार कार्यालयात आले होते. यावेळी तहसीलदार जे. पवार, दुय्यम निबंधक एम एम कुरुंदकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3ffBsQz
https://ift.tt/3rblAUT

No comments

Powered by Blogger.