Aaditya Thackeray:आदित्य ठाकरे यांचा आज राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा

सिंधुदुर्ग: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये पातळी सोडून एकमेकांवर सुरू असलेली टीका आणि आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता शिवसेनेचे मंत्री हे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा पर्यावरणविषयक कामकाजासाठी असेल. परंतु, राणे कुटुंबीय आणि मातोश्री यांच्यात नव्याने उफाळेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात काही विघ्न येणार का, हेदेखील पाहावे लागेल. आदित्य ठाकरे हे रविवारी कोल्हापूरमध्ये होते. काल रात्री अकरा वाजता आदित्य ठाकरे यांनी रंकाळा तलावाची पाहणी केली होती. आज अंबाबाईचे दर्शन घेऊन ते आढावा बैठक आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील. त्यामुळे या दौऱ्यात काय घडणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. ( Leader visit) यापूर्वी हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन सुरु असताना आदित्य ठाकरे यांना डिवचले होते. हे आंदोलन सुरु असताना आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याँव-म्याँव, असा आवाज काढून आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडविली होती. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपल्या या कृतीचे समर्थनही केले होते. त्यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून नितेश राणे यांच्याविरुद्ध पद्धतशीरपणे चक्रे फिरायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. तर दुसरीकडे कणकवली पोलिसांनी संतोष परब प्रकरणात चौकशीचा फास आवळायला सुरुवात केली. पोलिसांनी पद्धतशीरपणे व्यूहरचना करत नितेश राणे यांच्याविरोधात पुरावे गोळा करुन त्यांची कोंडी केली होती. विशेष म्हणजे या काळात राज्यातील बडे पोलीस अधिकारी सिंधुदुर्गात ठाण मांडून होते. नितेश राणे यांच्या वकिलांनीही न्यायालयात आदित्य ठाकरे यांना चिडवल्यामुळे आपल्या अशिलावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर नितेश राणे यांना दोन दिवस तुरुंगाची हवा खाली लागली होती.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/9pTfGCD
https://ift.tt/y27Nwjx

No comments

Powered by Blogger.