मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण

नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर मिठी नदी विकास, प्रदूषण नियंत्रण व पुनरुज्जीवन या विषयावर सादरीकरण केले. राज्यपालांनी सदर कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी श्री. चहल यांनी राज्यपालांना सन 2005 मध्ये मिठी नदीला आलेल्या पुरानंतर पालिकेने मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या कामाची विस्तृत माहिती दिली.
नदीतील गाळ उपसण्याचे आतापर्यंत झालेले कार्य, संरक्षक भिंतीच्या बांधकामाची स्थिती तसेच नदीच्या रुंदीकरणाची व खोलीकरणाची माहिती त्यांनी यावेळी राज्यपालांना दिली. सन 2006 च्या तुलनेत आज मिठी नदीची परिवहन क्षमता 3 पटींनी वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मिठी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेतर्फे केल्या जात असलेल्या कामाची देखील त्यांनी राज्यपालांना माहिती दिली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू देखील उपस्थित होते.
The post मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण appeared first on The GNP Marathi Times.
from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/KPxFk6Y
https://ift.tt/oyMSl2C
No comments