प्रमोद जठारांची अवस्था अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी; शिवसेना नेत्याची बोचरी टीका

सिंधुदुर्ग: यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली असल्याची घणाघाती टीका माजी जिल्हा बँक अध्यक्ष () यांनी केली. भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी सूडबुद्धीने नितेश राणेंवर () दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार सतीश सावंत यांनी घेतला. काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेल्या टीकात्मक विधाने आठवावीत. प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करताहेत. रिफायनरी पूर्ण होण्यासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणेंना खुश करण्याचे प्रयत्न जठार करताहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हैशी जठार विसरलेत. खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर १८ डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर अगदी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोर्टाला शरण गेले. नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. जर संतोष परबवर हल्ला होऊन त्याला १८ टाके पडल्यावर केंद्रीयमंत्री राणेंनी परबला खरचटले म्हटले होते. तसेच नितेश राणेंना ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगु ठरू नये. जरी मी राणेंसोबत होतो तरी बेकायदेशीर कृत्यावेळी मी साथ दिली नाही. गाड्या जाळपोळ, भाजपा तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक सारख्या प्रकरणात मी सोबत नव्हतो, असे माजी जिल्हा बँक सतीश सावंत यांनी सांगितले. प्रमोद जठार यांनी राणे विरोधात असताना नितेश राणे आणि नारायण राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय ? असा सवाल सावंत यांनी केला. तसे असेल तर आता राणेंची तळी उचलणाऱ्या प्रमोद जठार आणि जनतेची माफी मागावी, असे आवाहन सावंत यांनी केले. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी नितेश राणे यांच्या जमीन अर्जावर कोर्टाच्या दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे. आधी साडेबारा ते एक च्या दरम्यान सुनावणी होण्याची शक्यता होती. परंतु न्यायालयाने दुपारच्या सत्रात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती रोटे आज पासून चार दिवस सुट्टीवर असल्याची माहिती असून प्रधान न्यायाधीश हांडे यांच्यासमोर याबाबतची सुनावणी होईल. दरम्यान, नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदें यांनी न्यायालयावर इमेल द्वारे कोर्टवर काही आरोप केले असून त्याचे पडसाद आज युक्तिवादाच्या वेळी दिसून येऊ शकतात. त्यामुळे आज न्यायालयात एक वेगळीच खडाजंगी पाहायला मिळेल. सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत प्रत्यक्ष हजर राहणार असून नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर आहेत. तर सतीश मानशिंदें सुनावणीला ऑनलाइन हजर राहतील.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/gdABtQU
https://ift.tt/mZiAhfa

No comments

Powered by Blogger.