बँकेची थकबाकी असलेली व्यक्ती संचालक कशी होऊ शकते; नितेश राणेंच्या निवडीवरून शिवसेनेची टीका

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजप आमदार यांची निवड झाली आहे. यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये अपेक्षेप्रमाणे राजकारण सुरु झाले आहे. 'यांच्यासाठी केला होता का अट्टाहास', अशा खोचक शब्दांत शिवसेना नेते दीपक केसरकर () यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला. बँकेची थकबाकी असलेली व्यक्ती संचालक असू शकते की नाही, हा कायदेशीर मुद्दा आहे. नितेश राणे () यांची निवड मागच्या दाराने झाली आहे. थकबाकी असलेली व्यक्ती बँकेची संचालक असू शकत नाही, हा सहकार कायद्यातील नियम आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना कायदेशीर बाबींना तोंड द्यावे लागेल. निवडणुकीत त्यांच्याविरोधात लढलेले लोक न्यायालयात जातील व नितेश यांचे संचालकपद रद्द होईल. पुढे काय होईल, याबाबत मी बोलू शकत नाही. पण नितेश राणे यांनी सहकारात चांगले काम करावे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे नितेश राणे स्वीकृत संचालकपदावरील निवडीचे समर्थन केले आहे. माझी निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केली. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याच व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही त्या चौकटीत बसतो म्हणून पक्षाने ही जबाबदारी दिली, असे नितेश राणे यांनी म्हटले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यंदाचा निवडणूक चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत राणे विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला होता. याच काळात संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे नितेश राणे यांना अज्ञातवासात आणि नंतर तुरुंगात जावे लागले होते. परंतु, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे समर्थक पॅनलने महाविकासआघाडीला धूळ चारत बाजी मारली होती. नितेश राणेंची राऊतांवर टीका संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घाम पुसत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजे. कितीही आव आणला तरी घाबरलेला माणूस कसा दिसतो, हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्यासाठी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद मधला व्हिडिओ ट्विट केल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/198WKUo
https://ift.tt/4Newf6O

No comments

Powered by Blogger.