राष्ट्रपतींचा दौरा; मंडणगड तालुक्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था; 'या' ५ मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद

रत्नागिरी: राष्ट्रपती हे कोकणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या येथे आज येणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील प्रमुख पाच मार्गांवरील वाहतूक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिली. राष्ट्रपती सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मंडणगडमध्ये पोहोचणार आहेत. मंडणगड म्हाप्रळ चेक पोस्टकडून शेनाळे मार्गे मंडणगड शहरांमध्ये प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक शेनाळे फाट्यापासून बंद राहील. खेड दापोलीकडून मंडणगड शहरांमध्ये दापोली फाटा मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहील. बाणकोटकडून पाचरळ फाटा मार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाटापर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. बाणकोटकडून पाचरळ फाटा म्हाप्रळ शेनाळेफाटा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळकडून पेवे पंदेरी मार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अशा प्रकारे पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल, सुरक्षेसाठी ही वाहतूक काही काळ बंद राहील. म्हाप्रळकडून खेड दापोली बाणकोटकडे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा येथून कुंबळे मार्गे जाईल. खेड दापोली कडून महाडकडे जाणारी वाहतूक कुंबळे शेनाळे फाटा मार्गे वळविण्यात येत आहे. बाणकोटकडून मंडणगड मार्गे महाडकडे जाणारी वाहतूक देव्हारे, दापोली, कुंबळे शेनाळे फाटा मार्गे जाईल. म्हाप्रळकडून बाणकोटकडे मंडणगड मार्गे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा, कुंबळे दापोली देव्हारे मार्गे बाणकोटकडे जाईल. आत्तापर्यंत मंडणगड तालुकावासियांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले आहे. शनिवारी कोणत्याही प्रकारे राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुकावासियांनी आपले योगदान देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/jEOvt1c
https://ift.tt/T7RvjYI

No comments

Powered by Blogger.