Kirit Somaiya: मी गुन्हा केला असेल तर जेलमध्ये जाईन; संजय राऊतांच्या पत्रकारपरिषदेपूर्वी सोमय्यांचं वक्तव्य
प्रसाद रानडे, रत्नागिरी: हे केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भवनात पत्रकारपरिषद घेत आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत हे जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळेच आता 'साडेतीन लोकांची' नाटकं सुरु झाली आहेत. भाजपमधील या साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आतापर्यंत मुहूर्त शोधत होते का, असा सवाल किरीट सोमय्या () यांनी उपस्थित केला. ते सोमवारी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी मी गुन्हा केल्याचे पुरावे दिल्यास मी तुरुंगात जायला तयार आहे, असेही म्हटले. तसेच किरीट सोमय्या यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे यांनी नाटक बंद करावीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिलंय. त्याचं उत्तर का दिलं जात नाही, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. मुंबईतील शिवसेना भवनात दुपारी चार वाजता संजय राऊत पत्रकारपरिषद घेणार आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या बोलणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. हे सगळे आरोप करण्यात किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. संजय राऊत यांनी भाजप आणि ईडीच्या नेत्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे संजय राऊत किरीट सोमय्या आणि भाजपच्या अन्य नेत्यांना थेटपणे लक्ष्य करणार का, हे पाहावे लागेल. शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांना शिवसेना भवनात हजर राहण्याचे आदेश शिवसेना भवनातील आजच्या पत्रकारपरिषदेसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित असतील. खासदार अनिल देसाई यांनी तशा सूचना दिल्या आहेत. ही सगळी वातावरणनिर्मिती पाहता संजय राऊत राजकीय बॉम्ब टाकण्याची दाट शक्यता आहे. या पत्रकारपरिषदेत खासदार संजय राऊत हे भाजप पक्ष आणि ईडीमधील कथित संगनमताविषयी गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. संजय राऊत () यांनी तसा सूचक इशाराही दिला आहे. येत्या काही दिवसांत भाजपमधीलच 'साडेतीन' लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख (Anil Deshmukh) हे बाहेर असतील, असे राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे आता भाजपमधील 'ती' साडेतीन लोकं कोण?, याचा उत्सुकता सर्वांना लागली आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/WFzmeQk
https://ift.tt/e4EzK5k
No comments