Narayan Rane: नारायण राणे यांना मोठा धक्का; चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर हातोडा?

मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या युद्धातील प्रमुख शिलेदार यांना मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे () यांच्या कोकणातील निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे हा आदेश राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून आला आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा निलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता नारायण राणे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश बंगल्याला नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्याची पाहणी आणि मोजमाप केले जाण्याची शक्यता आहे. पालिकेच्या नोटीसनंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. 'आमच्याकडेही 'मातोश्री'चा आराखडा आहे' महानगरपालिकेने जुहूतील बंगल्याच्या पाहणीसंदर्भात नोटीस बजावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पलटवार केला होता. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-१, मातोश्री-२ बांधले. तेव्हा आम्ही काही म्हणालो का? भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पैसे देऊन मातोश्रीवरील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले. माझ्याकडे दोन्ही मातोश्रीचे आराखडे आहेत. पण मी कधीही कोणाच्या घराविषयी काही बोलत नाही. परंतु, माझ्या जुहूतील बंगल्याविषयी राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. पण आता शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/1ShCZuX
https://ift.tt/ug73qk5
No comments