Nitesh Rane : नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, छातीचं दुखणं कायम; आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: भाजप आमदार यांच्या छातीत अजूनही दुखत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. कणकवली दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याचवेळी नितेश राणे () यांची तब्येत व्यवस्थित नसल्याची माहिती वकिलांकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या विनंतीनुसार त्यांना सावंतवाडी कारागृहाऐवजी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. काल रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरीही नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. अशातच ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नितेश राणे यांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. पडवे मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर आर एस कुलकर्णी आणि डॉक्टर मिलिंद कुलकर्णी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांच्याशी महत्त्वाची चर्चा चालू आहे. थोड्याचवेळात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नितेश राणे यांना कोल्हापुरात नेले जाईल. 'जेलवारीची वेळ आल्यावर नितेश राणेंची तब्येत कशी बिघडते?' न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर धडधाकड असणारे आमदार नितेश राणे यांची तब्येत काहीच क्षणात कशी काय बिघडते?, असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरदेखील ते आजारी असल्याचे सर्टिफिकेट देतात. असे होत असेल तर लोकांमधील भीती कमी होऊन, कोणीही कायदा हातात घेऊ शकतो. यापूर्वी आपण गृहमंत्री असताना त्यांनी असाच बनाव केला होता. त्यावेळी त्याची मी पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना कोठडीत पाठवले होते. परंतु यावेळी असे काहीच झाले नाही. असेच होत राहिले तर लोकांच्या मनातील भीती कमी होऊ शकते. त्याची खरीच तब्ब्येत बिघडली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली होती. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता कणकवली सत्र न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी तब्येत बिघडल्यामुळे नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात यावे, असा अर्ज तुरुंग अधीक्षकांना पाठवला होता. ही मागणी मान्य करत नितेश राणे यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/4euPBHR
https://ift.tt/7jhMndW

No comments

Powered by Blogger.