rane vs naik: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कोणाचीही दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा टोला

सिंधुदुर्ग: भाजप (Nitesh Rane) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना न्यायालयाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. याबाबत शिवसेनेचे (Vaibhav Naik) यांनी नितेश राणे आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जर नितेश राणे या प्रकरणात निर्दोष असते तर त्यांना कोठडीत जावे लागले नसते, असा टोला आमदार नाईक यांनी नितेश राणे यांना लगावला आहे. ( mla vaibhav naik criticizes after ) नितेश राणे यांच्यावर टीका करताना आमदार नाईक म्हणाले की, भाजप आमदार नितेश राणे जर निर्दोष असते तर त्यांना जेलची हवा खावी लागली नसती. नितेश राणे यांची जामिनावर मु्क्तता झाली आहे. ही मुक्तता झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक जल्लोष करताना दिसत आहेत. नितेश राणे यांच्यावर चुकीची कारवाई करण्यात आली असे आरोप ते करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- नितेश राणे यांचा संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात थेट सहभाग संतोष परब या शिवसैनिकावरील हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचा थेट सहभाग आहे याचा पुरावा असल्यामुळेच त्यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळालेला नाही. आता या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली असून न्यायालयाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना कणकवलीत येण्यास बंदी घातलेली आहे. तपासात कोणताही अडथळा आणण्यासही बंदी घातलेली आहे, असेही नाईक पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता तो सिद्ध होईल किंवा होणार नाही, हा कोर्टाचा निर्णय असेल. मात्र, त्यांचा या हल्ल्यात सहभाग असल्यानेच त्यांना जेलची हवा खावी लागली आहे, हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी लक्षात घ्यावे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे कोणाचीही दहशत चालणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे नाईक पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/NkqLdAQ
https://ift.tt/f84FzQy

No comments

Powered by Blogger.