Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील अवलियाने चक्क तिळाच्या दाण्यावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: राज्यभरात शनिवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने सोशल मीडियावर शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे एक छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले होते. ही प्रतिकृती तिळाच्या दाण्यावर साकारण्यात आली होती. त्यामुळे ही कलाकृती पाहून अनेकजण थक्क झाले होते. चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी शिवरायांना मानवंदना देण्यासाठी तिळावर छत्रपतींची प्रतिमा साकारली होती. तिळाच्या लहान दाण्यावर ही प्रतिकृती साकारण्यासाठी अक्षय मेस्री यांनी भिंगाचा वापर केला. गेल्यावर्षी अक्षयने एक सेंटीमीटर आकारात छत्रपतींची प्रतिमा साकारली होती. मात्र, यावेळी शिवजयंतीचे निमित्त साधून मेस्त्री यांनी चक्क तिळावर छत्रपतींची प्रतिमा साकारली. तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारायला अर्धा तास लागला. त्यासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे. तिळावरील या चित्राची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी इच्छा आहे. मात्र, त्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे अक्षय मेस्त्री यांनी सांगितले. अक्षय मेस्त्री यांनी यापूर्वी अनेक महान व्यक्तींना मानवंदना दिली आहे. भारतरत्न लता मंगेशकर, दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण, पद्मश्री सिंधुताई सकपाळ, बाळासाहेब ठाकरे, भारूडरत्न निरंजन भाकरे, बिपीन रावत, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, बाबासाहेब पुरंदरे अशा व्यक्तींना आपट्याच्या पानावर, तुळशीच्या पानावर, सुपारीवर, वृत्तपत्रावर, विटांवर तर कधी तिळावर अत्यंत कमी वेळेत सुंदर चित्र साकारून एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली वाहत आले आहेत. ६००० रोपांच्या माध्यमातून साकारली शिवरायांची प्रतिमा कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारली होती. तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली होती.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/WMePOlI
https://ift.tt/KkJgVUC

No comments

Powered by Blogger.