Sindhudurg: कणकवलीत वातावरण तापलं; नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर...

: काँग्रेसबाबत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री यांच्या सिंधुदुर्गातील कणकवलीतील बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच नारायण राणे यांचे समर्थक आक्रमक झाले असून, ते राणेंच्या बंगल्याबाहेर एकत्र आले आहेत. राणे समर्थकांनी यावेळी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर राणेंच्या बंगल्यापासून दोनशे ते अडीचशे फुटांवर काँग्रेस कार्यकर्ते येत असतानाच, पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे कणकवलीत राणे यांच्या बंगल्याबाहेर काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. काँग्रेसनं देशभरात करोना पसरवला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद अधिवेशनात केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आणि इतर ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने झाली. त्यानंतर राज्यभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष बघायला मिळाला. आता, कोकणातही वातावरण तापलं आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत केंद्रीय नेते आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्गातील कणकवलीत वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच नारायण राणे यांचे समर्थक हे आक्रमक झाले होते. राणे यांच्या ओम गणेश बंगल्याबाहेर सकाळपासूनच समर्थक आणि भाजप कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी राणे समर्थकांनी काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणेंच्या बंगल्याबाहेर श्रीफळ वाढवून मालवणी भाषेत गाऱ्हाणे मांडले. काँग्रेसला सद्बुद्धी देरे म्हाराजा असे गाऱ्हाणे समर्थकांनी मांडले. दुसरीकडे महिला कार्यकर्त्याही आक्रमक झाल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राणेंच्या बंगल्यावर येऊनच दाखवावे, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. एकीकडे राणे समर्थक आक्रमक झालेले असतानाच, काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारीही आक्रमक झाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत आंदोलन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयापासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. राणे यांच्या बंगल्याकडे कार्यकर्ते जात असतानाच, दोनशे ते अडीचशे फुटांवर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. त्यांना ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे काही काळ कणकवलीत वातावरण तणावपूर्ण झाले होते.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/0B9WFtA
https://ift.tt/Vh1sMQt

No comments

Powered by Blogger.