सिंधुदुर्ग: फोंडाघाटात उद्योजकाच्या कारला आग, एकाचा होरपळून मृत्यू; पण....

: तालुक्यातील वागदे येथील उद्योजक नीलेश काणेकर यांच्या मालकीच्या कारला फोंडाघाटात भीषण आग लागली. यात एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. मात्र उद्योजक नीलेश काणेकर यांचा फोन 'नॉट रिचेबल' येत आहे. मात्र, या आगीत मृत झालेली व्यक्ती कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेह डीएनए तपासणीसाठी पाठवणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. उद्योजक काणेकर हे राधानगरी येथे जातो असे सांगून कार्यालयातून निघाले होते. काही लोकांनी काणेकर यांना बघितले होते. ते एकटेच कार चालवत होते, अशी माहिती मिळाली आहे. तर पोलीस घटनास्थळी पंचनामा करून जळलेला मृतदेह डीएनए तपासणीसाठी पाठवणार आहेत. तर काणेकर यांचे मोबाइल लोकेशन तपासले जात आहे. फोंडा घाटात खिंडीनजीक कारला भीषण आग लागल्याची घटना, काल सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. त्या कारला कशामुळे आग लागली याचे कारण समजले नाही. ही कार कणकवली येथील नीलेश काणेकर यांच्या नावावर नोंदली असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मात्र, तो मृत व्यक्ती कोण याची माहिती मिळू शकलेली नाही. त्याबाबत तपास सुरू आहे.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/csSL5k3
https://ift.tt/GQgqpIi

No comments

Powered by Blogger.