मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र आणि भीषण अपघात, ट्रकच्या जोरदार धडकेनंतर दुचाकी बसवर आदळली

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण आणि विचित्र झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर ती समोरील एसटी बसवर आदळली. या विचित्र अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा जखमी झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे आज, शनिवारी दुपारी हा अपघात झाला. ट्रकने धडक दिल्यानंतर दुचाकी एसटी बसवर आदळली. या भीषण अपघातात कापडगाव येथील महिला सुमित्रा कोत्रे यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा दीपक जखमी झाला आहे. हातखंबाजवळ उतरणीला दुचाकीच्या समोर एसटी बस होती. त्यामुळे दुचाकीस्वार दीपक कोत्रे याने वेग कमी केला. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा ट्रक कर्नाटक येथील असल्याचे समजते. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर ती एसटी बसवर आदळली. या विचित्र अपघातात दुचाकीवर मागे बसलेली दीपकची आई सुमित्रा कोत्रे ही जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. दीपक कोत्रे हा जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. ट्रक हा कर्नाटकचा असून, पोलिसांकडून चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/Q8Gm7T1
https://ift.tt/eOBlk8w

No comments

Powered by Blogger.