मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक करास तात्पुरती स्थगिती – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक कराला तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार, श्रीमती विद्या ठाकूर, अमीन पटेल, रवींद्र वायकर, अतुल भातखळकर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, योगेश सागर, अमित साटम आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर उत्तर देताना मंत्री श्री थोरात यांनी माहिती दिली.
महसूल मंत्री थोरात म्हणाले, अकृषीक कर हा जमिनीवरील मूलभूत कर असून तो राज्याच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. अकृषीक कराची आकारणी ही कायदा व नियमातील तरतुदीनुसार राज्य शासनाने सन 2017 मधील सुधारित तरतुदीनुसार व 5 फेब्रुवारी 2018 रोजीच्या निर्देशानुसार केली आहे.
अकृषिक करासंदर्भात मुंबई उपनगरात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी याविषयी विनंती केली आहे. कोरोनामुळे सोसायटीला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीचा विचार करून मुंबई उपनगरातील अकृषिक कर आता स्थगित करण्यात येणार असल्याचे मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.
The post मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक करास तात्पुरती स्थगिती – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात appeared first on The GNP Marathi Times.
from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/DhTHP8X
https://ift.tt/woIL6KQ
No comments