वैद्यकीय शिक्षण अर्धवटच राहिलं; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना आता सतावतेय करिअरची चिंता

प्रसाद रानडे, रत्नागिरी: रशिया आणि यांच्यात तुफान युद्ध सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन भारतात परतण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर या युद्धामुळे अक्षरशः तूर्तास तरी पाणी फिरले आहे. या युद्धामुळे अतिशय विचित्र परिस्थितीत अनेक विद्यार्थी अडकले आहेत. युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. २२० विद्यार्थी गुरुवारी रात्री सुखरूप दिल्ली विमानतळावर उतरले. मंडणगडचा आकाश कोबनाक,औरंगाबाद स्वाती चौधरी,पालघरचा निशांत या विद्यार्थ्यांनी मोदी सरकार व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. पण आता या विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता सतावू लागली आहे. डॉक्टर होण्यासाठी युक्रेन देशात गेलेल्या या विद्यार्थ्यांना आता आपल्या करिअरची चिंता सतावत आहे. मोदी सरकारला आमची हात जोडुन कळकळीची विनंती आहे की, त्यांनी यावर काहीतरी मार्ग काढावा. आता आम्हाला वैद्यकीय शिक्षणासाठी दुसऱ्या देशात पाठवणे पालकांना आर्थिकदृष्ट्या झेपणारे नाही. तर युक्रेनहून परतलेल्या मुलांनी आपला अनुभव कथन केला. सोमवारी सकाळी बॉर्डर क्रॉस केली आणि बुरारेस्टच्या दिशेने गेलो. रोमानियात आल्यावर खुप चांगली स्थिती आहे. पण बॉर्डर क्रॉस करेपर्यंत खुप भयंकर परिस्थिती आहे. अजूनही कित्येक विद्यार्थी अडकलेत. तेही गंगा ऑपरेशन अंतर्गत भारतात लवकर दाखल होतील, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आकाश कोबनाक याने शुक्रवारी रात्री थेट दिल्लीहून 'महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन' जवळ संपर्क साधून ही माहिती दिली व आपल्या भावना व्यक्त केल्या. युक्रेनहुन निघाल्यावर बॉर्डर येईपर्यंत खाण्यापिण्याचे पण हाल सुरू आहेत. बर्फ पडतोय, तापमानाचा पारा प्रचंड घसरला आहे. ही थंडी अनेकांना सहन होत नाही. काही मुली तर बेशुद्ध पडत होत्या. याही अवस्थेत आम्ही दोन तीन दिवस प्रवास करत होतो. युक्रेनमधील नागरिक शक्य होईल व जमेल तशी आम्हाला मदत करत आहेत, असेही आकाशने सांगितले. सध्या आमची व्यवस्था दिल्लीत महाराष्ट्र सदनात राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी दुपारी आकाश मुंबईत पोहोचला आहे. या सगळ्या प्रवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय दूतावास अधिकारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या सगळ्यांचे आभार मानले आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/yvS7E3u
https://ift.tt/ChOHYg9
No comments