Konkan News: राजापूरमध्ये सलून व्यावसायिकाची निर्घृण हत्या; चेहरा आणि डोक्यावर वार

प्रसाद रानडे, रत्नागिरी: राजापूर शहर चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेले सलून व्यावसायिक राजेश चव्हाण यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रानतळे येथील सड्यावर ते मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारहाणीच्या खूणा असल्याने हा सगळा घातपाताचा असावा असा संशय व्यक्त होत आहे. ( in Ratnagiri ) पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चव्हाणवाडी येथील सलून व्यवसायिक राजेश चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोठेहीआढळून आले नाहीत. अखेर मंगळवारी त्यांच्या पत्नीने सकाळी राजापूर पोलिसस्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता राजेश याचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाले. पोलिसांनी या परिसरात शोध घेतला असता मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर सड्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची खबर मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. राजेश यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच चेहऱ्यावर जोरदार मार लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. चेहरा रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. तसेच राजेशच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचा मोबाईलही फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्यपदार्थही आढळून आले. त्यामुळे राजेश चव्हाण यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/TMpJGyC
https://ift.tt/xZp2VQv

No comments

Powered by Blogger.