Rane Criticizes Raut: 'राऊत पगार सामनाचा घेतात आणि इमानदारी तिकडे दाखवतात'; नीलेश राणेंची जहरी टीका
चिपळूण: भाजपचे युवा नेते, माजी खासदार (Nilesh Rane) यांनी ऐन शिमगोस्तवात कोकणात रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे पत्रकार परिषदेत घेत शिवसेनेसह (MP Sanjay Raut), उपमुख्यमंत्री अजित पवार () यांच्यावर गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांना काढलेली नोटीस व राणे कुटुंबीयांविरोधातील कारवायांवरही भाष्य केले आहे. संजय राऊत यांना किती गंभीरपणे घ्यायचे हे आता पत्रकारांनी ठरवायला हवे, मी गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. (bjp leader criticizes shiv sena ) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना माजी खासदार राणे म्हणाले की, संजय राऊत ते शंभर टक्के शरद पवार यांचा माणूस असून ते पगार सामनाचा घेतात आणि ते इमानदारी मात्र तिकडे दाखवतात, अशी टीका करत संजय राऊत यांनी आजवर किती विषय तडीस नेले ते सांगावे, असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत हे महाराष्ट्रातील एकाही विषयावर बोलत नाहीत, असे सांगत अशा व्यक्तीला महाराष्ट्रात महत्व आहे का?, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे. राऊत हे कधी निवडणुकीला उभे राहिलेले नाहीत. जर कधी नगरसेवक पदासाठी निवडणुकीला उभए राहिले तरी त्यांची अनामत रक्कम जप्त होईल अशी परिस्थिती आहे. अशा व्यक्तीला काय महत्व द्यायचे? क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत हे शिवसेनेला संपवणार आहेत. त्यांनी तसे शरद पवार यांच्याशी डिल करून ठेवले आहे. तुम्ही बाहेर राहून करू शकला नाहीत, ते मी आत राहून करून दाखवतो, असे त्यांनी पवार यांना सांगितले आहे. म्हणून सन २०२४ ला भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल आणि ती स्थिती संजय राऊत हेच आणणार आहेत. संजय राऊत हे शंभर टक्के पवारांचा माणूस आहे. ते त्यांच्या पेरोलवरच आहेत. ते पगार सामन्याचा घेतात आणि इमानदारी मात्र तिकडे दाखवतात. क्लिक करा आणि वाचा-
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/OqHXuVd
https://ift.tt/GImKg2b
No comments