Ratnagiri : तरूणी अभ्यासासाठी खोलीत गेली, बराच वेळ बाहेर आली नाही; कुटुंबीयांनी बघितल्यानंतर धक्काच बसला

रत्नागिरी: शहराजवळील कारवांचीवाडी येथे धक्कादायक घटना घडली. एका तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची बारावीची परीक्षा सुरू आहे. अभ्यास करण्यासाठी जाते असे सांगून ती खोलीत गेली, मात्र बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. घरच्यांनी खोलीत जाऊन बघितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण समजू शकलेले नाही. कारवांचीवाडी येथे ही घटना घडली. तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची बारावी इयत्तेची परीक्षा सुरू होती. परीक्षेचा अभ्यास करायला खोलीत जाते, असे सांगून ती निघून गेली. मात्र, बराच वेळ ती बाहेर आली नाही. कुटुंबीयांनी खोलीत जाऊन बघितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. शनिवारी, ५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैष्णवी (वय २१, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे या तरुणीचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही बारावी इयत्तेत होती. तिची परीक्षा सुरू आहे. अभ्यास करायला जाते असे सांगून ती खोलीमध्ये गेली. परंतु, बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. तिच्या कुटुंबीयांनी खोलीत जाऊन बघितले असता, तिने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिच्या भावाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/QdV6a3W
https://ift.tt/jcHOXS6
No comments