शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता बोरिवली येथील वसतिगृहात शासनामार्फत मोफत निवासाची व्यवस्था करण्यात येते. या वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता इच्छुकांकडून १७ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत  प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

वसतिगृहामधील प्रवेश नियमावली पुढील प्रमाणे आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत राहणारे नसावे, अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतिगृह सोडावे लागेल. काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील. त्यानंतर त्यांना वसतिगृह सोडणे अनिवार्य राहील. वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी अनामत रक्कम म्हणून वसतिगृहाच्या व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.

इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज  पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत. अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे, तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहित नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र (पासपोर्ट आधारकार्ड/संबंधित पत्र) आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे

The post शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन appeared first on The GNP Marathi Times.



from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/PL8wrek
https://ift.tt/kuAa4pe

No comments

Powered by Blogger.