लवेल येथील एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत भीषण वणवा
खेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी च्या नवीन संपादित केलेल्या लवेल येथील मोकळ्या जागेत आज भीषण वणवा लागला , हा वणवा इतका भीषण होता कि लवेल येथील महावितरण च्या सब स्टेशन ला आगीने विळखा घातला होता , तब्बल २ ते ३ किलोमीटर अंतरावर हा वणवा लागला होता , रात्री उशिरा पर्यंत हा वणवा धगधगत असल्याने अनेक घरांना धोका देखील निर्माण झाला होता
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी मधील नवीन संपादित जागेत गावातला मोठा वणवा लागला , तब्बल २ ते ३ किलोमीटर अनंतरवरून हा वणवा दिसत होता , अनेक भूचर प्राणी देखील या वणव्याच्या भक्षस्थानी गेल्याचा संशय देखील व्यक्त केला जात होता , लवेल येथील महावितरण चे असणाऱ्या सब स्टेशन ला देखील या वनव्याने विळखा घातला होता , या वणव्याच्या प्रचंड धुरामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहने चालवण्यासाठी देकील अडथळा येत होता , गेल्या वर्षी देखील अस्गनी येथील वन विभागाच्या जंगलाला लागलेल्या वणव्यात अनेक औषधी आणि लागवड केलेली झाडे आगीच्या भक्षस्थानी गेल्याची घटना घडली होती .
No comments