बदलापूर नगरपालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक
बदलापूर : बदलापूर नगरपालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत राज्यात दुसरा तर देशात १४ व क्रमांक आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या उपस्थितीत बदलापूर शहराला “३ स्टार” मानांकन प्रदान करण्यात आले.
विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी योगेश गोडसे, प्रशासक तथा मुख्याधिकारी आरोग्य विभागप्रमुख आणि स्वच्छ भारत अभियानाच्या नोडल अधिकारी वैशाली देशमुख आणि समन्वयक युवराज झुरंगे आदींनी पुरस्कार स्वीकारला.
कचरामुक्त तारांकित शहर स्पर्धेसाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून प्रयत्न केले. मुख्याधिकारी गोडसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन आणि शहार स्वच्छता यामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचा केलेला अंतर्भाव, नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे परिश्रम आणि नागरिक व स्वयंसेवी संस्था यांचा सकारात्मक प्रतिसाद या सर्व कामगिरीची दखल घेत बदलापूर शहराला कचरामुक्त तारांकित शहर-थ्री स्टार मानांकन प्रदान करण्यात आले.
नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे सफाई मित्र आणि नागरिक यांच्या सांघिक कार्यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असल्याचे मुख्याधिकारी गोडसे यांनी सांगितले.
No comments