कशेडी घाटात अपघात; टँकर चालकाचा मृत्यू
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका अवघड वळणावर रसायन वाहू टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात केबिनमध्ये अडकून पडल्याने चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर खेद पोलिस, कशेडी वाहतूक पोलीस आणि मदत ग्रुपच्या सदस्यांनी क्रेनच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांतचालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टँकर चालक टँकर क्रमांक एम एच ०४ जे के ७७१७ घेऊन गुजरात राज्यातील वापी येथून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रसायन घेऊन निघाला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो महामार्गावरील कशेडी घाट उतरत असताना आंबा स्टॉप येथील अवघड वळणावर त्याचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो टँकर गटारात पलटी झाला. या अपघातात चालक वशीम हा केबिनमध्ये अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
No comments