केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत आंदोलनाला पाठींबा दिला

सावंतवाडी : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत आंदोलनाला पाठींबा दिला यावेळी याबाबत लोकसभेच्या अधिवेशनात देखील लक्ष वेधणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली. कामगारांना आमचा पाठींबा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. संपाला शिवसेना, राष्ट्रवादी जबाबदार आहे. दरम्यान, तर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार हे तोडगा काढत नाहीत. महाराष्ट्रतील प्रश्न खेळवत ठेवण्याकडे त्यांचा कल असतो असा आरोप नारायण राणे यांनी केला. यावेळी जि.प.अध्यक्षा संजना सावंत, संध्या तेरसे, महेश सारंग, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, प्रमोद कामत, अंकुश जाधव, शर्वाणी गावकर, सभापती निकिता सावंत, आरोग्य सभापती सुधीत आडिवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, युवा नेते मकरंद तोरसकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, शेखर गावकर, गुरु पेडणेकर, अजय सावंत, संतोष गांवस, बंटी पुरोहित, अमित परब, आनंद तळवणेकर आदि भाजप, पाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.