लोटे येथील घरडा केमिकल्समध्ये वायूगळती


रत्नागिरी :  लोटे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या घरडा केमिकल्स या कंपनीत  गुरुवारी दुपारी वायूगळती झाली असल्याचे वृत्त आहे.

त्यामुळे त्रास झालेल्या 17 कामगारांना कंपनी प्रशासनाने घरडा रुग्णालयात दाखल केले. तर, प्रकृती गंभीर असलेल्या एका कामगाराला चिपळूण मधील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

मात्र, याबाबत कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments

Powered by Blogger.