वार्षिक निरंकारी संत समागमाला २७ नोव्हेंबर पासून सुरुवात
मुंबई : ७४ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी यावर्षी व्हर्च्युअल रूपात करण्यात आली आहे. अशी माहिती संत निरंकारी मंडळातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की, संस्कृती आणि सार्वभौमत्वाची बहुरंगी झलक यावर्षीही व्हर्च्युअल रूपात दर्शविण्यात येईल. हा संत समागम २७, २८ व २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी साजरा होणार असून समागमाचा मुख्य विषय ‘विश्वास, भक्ती व आनंदङ्क असा आहे. संपूर्ण समागमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवर तसेच साधना टी.व्ही चॅनलच्या माध्यमातून केले जाणार आहे. समागमाच्या तिन्ही दिवशी माता सुदीक्षाजी प्रवचनांद्वारे आशीर्वाद प्रदान करतील. यावर्षीचा संत समागम पूर्णपणे व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत असला तरी त्याला जीवंत रूप देण्यासाठी मिशनकडून रात्रंदिवस अथक प्रयास केले जात आहेत ज्यायोगे जेव्हा त्याचे प्रसारण होईल तेव्हा त्याची अनुभूती आणि आनंद प्रत्यक्ष समागमाप्रमाणे घेता येईल. विश्वभरातील वक्ते, गीतकार आणि कवी या विषयावर आपले विचार, भक्तीरचना आणि कविता समागमामध्ये सादर करतील.या निरंकारी संत समागमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत निरंकारी मंडळातर्फे करण्यात येत आहे.
No comments