खेड रेल्वेस्थानक प्रमुख रफिक नांदगावकर यांचा गौरव
खेड : खेड रेल्वेस्थानक प्रमुख रफिक नांदगावकर यांना कोकण रेल्वेने खास प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.
जुलै 2021 मध्ये चिपळूण स्टेशन आणि परिसर जलमय होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. त्या दरम्यान तेथे अडकलेल्या तुतारी एक्सप्रेसमधील 400 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था कोकण रेल्वेच्या खेड स्थानका मधून करण्यात आली होती., हे काम चोख पार पाडल्याबद्दल खेड रेल्वेच स्थानक प्रमुख रफिक नांदगावकर यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांना कोकण रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन नुकताच गौरव करण्यात आला नांदगावकर हे वावे तर्फ नातू येथील मूळचे रहिवासी आहेत.
No comments