किरीट सोमय्यांच्या खोट्यानाट्या आरोपांमुळे कोकणातील पर्यटनावर घाला; अनिल परबांचा आरोप

रत्नागिरी: यांच्या खोट्यानाट्या आरोपांमुळे कोकणातील पर्यटनावर घाला घातला जात आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री यांनी केले. सोमय्या दावा करत असलेल्या मुरुड येथील रिसॉर्टशी माझा काडीमात्र संबंध नाही. सरकारी अहवालात ही बाब स्पष्ट झाली असूनही सोमय्या माझ्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे मी न्यायालयात त्यांच्याविरोधात १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. ते बुधवारी दापोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दापोलीच्या मुरुड येथील साई रिसॉर्टशी माझा काडीमात्र संबंध नाही. याबाबत सरकारी अहवालात स्पष्टीकरण असूनही किरीट सोमय्या वारंवार माझी बदनामी करत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एकतर त्यांनी माफी मागावी अथवा त्यांना १०० कोटी रुपये द्यावे लागतील. मात्र, किरीट सोमय्या माझ्यावर आरोप करण्याच्या नादात कोकणातील पर्यटनावर एकप्रकारे घाला घालत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील, असे अनिल परब यांनी म्हटले. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच दापोलीत येऊन अनिल परब आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर आता त्यांनी मंत्री अनिल परब यांना वाचवून दाखवावेच, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते. रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात परब यांचे रिसॉर्ट असून त्याचे सगळे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. कारवाई सुरु झाली असली तरी फौजदारी दाखल करावीच लागेल. ठाकरे सरकारच्या काळातच कारवाई सुरु झाली आहे. मात्र, हे सरकार अनिल परब यांना पाठीशी घालू शकणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. आपण जून महिन्यात याविषयी तक्रार नोंदवली होती. कोणतीही चौकशी न करता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मंत्री परब यांना कोणत्या अधारे क्लीन चीट दिली, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मंत्र्यांची चमचेगिरी करु नका. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महसूल, भारत सरकार पर्यावरण विभाग, तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. बांधकाम तोडण्याचे आदेश निघाले, तरीही जिल्हा पोलीस अधीक्षक कोणत्या आधारे क्लिनचीट देतात, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला होता. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी परवानगी खोटी होती म्हणूनच रद्द केली. लोकायुक्तांकडे झालेल्या तक्ररीत सगळी माहिती समोर आली आहे. म्हणूनच बिनशेती परवाना रद्द करण्यात आला. त्यावेळी असलेले प्रांताधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली होती.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3m8WDaR
https://ift.tt/3J3zRv9
No comments