राऊत म्हणाले, जैतापूर मुद्दा संपलाय; सामंत म्हणाले, आधी स्थानिकांशी चर्चा करु! जैतापूरवरुन शिवसेनेत दोन गट?

मुंबई: कोकणातील जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा राज्यात पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. कारण, यावरुन सध्या शिवसेनेतच दोन गट पडल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने नुकतीच जैतापूरमध्ये सहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी तत्वत: मंजुरी दिली. यानंतर कोकणातील शिवसेनेचे खासदार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. हा मुद्दा केव्हाच संपलाय, असे विनायक राऊत यांनी म्हटले. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे राज्यातील मंत्री यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. जैतापूर प्रकल्पासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करावी लागेल. जनभावना लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेता येईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता जैतापूरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतच दोन गट पडले आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील एका गटाची जैतापूर प्रकल्पाविषयीची भूमिका मवाळ झाली आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. यापूर्वी जैतापूरमध्ये दोन अणुभट्ट्या उभारण्यात येणार होत्या. मात्र, आता केंद्र सरकारने सहा अणुभट्ट्या उभारण्याला मान्यता दिली आहे. केंद्राने काय जाहीर केलंय, हे स्थानिकांना सांगावं लागेल. त्यासाठी स्थानिक खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आणि मी स्वत: स्थानिकांशी चर्चा करु. दहा-बारा वर्षांनंतर स्थानिकांची जैतापूर प्रकल्पाविषयीची भूमिका बदलली आहे का, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्यांच्यामध्ये काही बदल झाला आहे का, हे बघावे लागेल. तसेच जैतापूर प्रकल्पातून स्थानिकांना किती आणि कोणत्या पद्धतीचा रोजगार मिळणार? यामधून कोकणाचा किती उत्कर्ष होणार, या बाबी तपासून पाहाव्या लागतील. त्यामुळे स्थानिकांशी चर्चा केल्याशिवाय जैतापूर प्रकल्पाबाबत ठोसपणे काहीही बोलणे योग्य होणार नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले. विनायक राऊत काय म्हणाले? केंद्र सरकार जैतापूर प्रकल्पाचं गाडलेलं मुडदं पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा हा संपल्यात जमा आहे. केंद्र सरकारने यापूर्वीही अशा प्रकारे अनेकदा वक्तव्य केलं आहे. पण प्रत्यक्षात जमिनीस्तरावर काहीही होत नाही. जैतापूर प्रकल्पाबाबत अनेकदा केंद्र सरकारने संसदेत उत्तरं दिली आहेत. यामुळे गांभीर्यानं घेण्यासारखं आता त्यात काहीही राहिलेलं नाही. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा आणि स्थानिकांचा विरोध कायम असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. देशात आता विजेची कमतरता नाही. तरीही केंद्र सरकार अणुऊर्जेच्या मागे लागले आहे. अणुऊर्जा निर्मिती ही खूप महाग आहे. ती परवडणारी नाही. सौर ऊर्जेचा सरकारने विचार करावा. तसंच केंद्र सरकार ज्या फ्रान्समधील कंपनीशी बोलणी सुरु असल्याचे सांगत आहे, ती कंपनी कधीच बुडाली आहे. यामुळे जैतापूर प्रकल्पाबाबत केंद्र सरकार फक्त औपचारिकता दखवत उत्तर देत आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेत कुठलाही खरेपणा नाही, असेही विनायक राऊत यांनी म्हटले.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3e1aifO
https://ift.tt/3FgXE8c

No comments

Powered by Blogger.