बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र’ आणि ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाचे निवेदन नागसेन कांबळे यांनी केले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/334xAiD
https://ift.tt/3dnwMHp
No comments