'भाजपचा 'तो' नेता एक नंबरचा दलाल, प्रकल्पासाठी जमिनी हडपल्या; आता पैसे अडकल्यामुळे तडफड'

सिंधुदुर्ग: कोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प येणार म्हणून भाजपच्या यांनी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर जमिनी विकत घेतल्या होत्या. मात्र, हा प्रकल्प बारगळल्याने त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. हा मोबदला मिळवण्यासाठी त्यांची अजूनही तडफड सुरु आहे. मात्र, प्रमोद जठारांच्या () दहा पिढ्या गेल्यातरी शिवसेना कोकणात नाणार प्रकल्प होऊन देणार नाही, असे शिवसेना खासदार () यांनी ठणकावून सांगितले. ते देवगड येथील मेळाव्यात बोलत होते. यावेळी विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते नारायण राणे आणि प्रमोद जठार यांना धारेवर धरले. प्रमोद जठार म्हणजे दलालीतला एक नंबरचा माणूस आहे. मला त्याच्या दलालीशी काहीही देणेघेणे नाही. नाणार रिफायनरीच्या नावाखाली प्रमोद जठार यांनी मोठ्याप्रमाणावर जमीन हडप केली. मात्र, प्रकल्प बारगळल्याने आता जमिनीचा मोबदला मिळत नाही म्हणून जठार यांची तडफड सुरु आहे. तुम्ही कितीही नारळ फोडा, मला फरक पडत नाही. माझ्या पाठिशी लोकांचे आशीर्वाद आहेत. तुमची दलाली बुडाल्याचं मला दु:ख वाटत नाही. काहीही झाले तरी मी नाणार प्रकल्प होऊन देणार नाही, असे विनायक राऊत यांनी म्हटले. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचाही समाचार घेतला. भाजपमध्ये गेल्यावर राणे कुटुंबीयांनी त्यांचे रंग बदलले. विरोधी पक्षात असताना नारायण राणे नाणार प्रकल्पाला विरोध करत होते. मात्र, आता भाजपमध्ये गेल्यापासून त्यांनी सपशेल लोटांगण घातले आहे. राणे कुटुंबीयांची ही भूमिका दुटप्पी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सिंधुदुर्ग जिल्हा आंदण म्हणून दिलेला नाही, असेही विनायक राऊत यांनी म्हटले. 'नारायण राणेंनी कोकणात पुन्हा रक्तरंजित राजकारणाला सुरुवात केलेय' या मेळाव्यात विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या निकटवर्तीयावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातही भाष्य केले. सिंधुदुर्गात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रक्तरंजित निवडणुकांना सुरुवात झाली आहे. 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव बदनाम झालं होतं. आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे पुन्हा दुराचारी लोकांनी हिंसाचाराच्या घटना घडवण्याचे काम सुरु केल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3eb8MYk
https://ift.tt/3mcGVM3

No comments

Powered by Blogger.