कदम-परब गटांत जुंपली, आता सूर्यकांत दळवी-नारायण राणे भेटीचा 'तो' Video व्हायरल

रत्नागिरी: अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी जिल्हयात सध्या नगरपंचायत निवडणूक चर्चेचा विषय ठरला आहे. आणि अनिल परब यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. नेते रामदास कदम यांनी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर दापोली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव असून अनिल परब गद्दार आहेत अशी टीका केल्याने खळबळ उडाली होती. माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार संजय कदम या गद्दारांच्या हातात शिवसेनेची सूत्रे देत विद्यमान आमदार योगेश कदम यांना बाजुला ठेवल्याने रामदास कदम व अनिल परब यांच्यातील वाद आता संघटना पातळीवर आले आहेत. त्यामुळे मातोश्री वरून नेमका कोणती भूमिका घेतली जाते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे. या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी सूर्यकांत दळवी यांना व्यासपीठावर मानाचे स्थान मिळाले होते. यामध्ये सूर्यकांत दळवी राणेंना व्यासपीठावर नमस्कार करताना दिसत आहेत. खेड नातूनगर येथील हा व्हिडीओ असून याचवेळी राणे यांनी रायगड येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काही वेळातच सूर्यकांत दळवी व नारायण राणे ही भेट झाली होती. त्यामुळे आता सूर्यकांत दळवी यांच्यावर मातोश्री कोणती कारवाई करणार, असा सवाल उचलबांगडी करण्यात आलेले दापोलीचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्हयात दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडी करून विद्यमान आमदार योगेश कदम याना बाजुला ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर प्रचार सभेच्या बॅनर वरुनही त्यांचा फोटो नव्हता या सगळ्या घडामोडींमुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेवा आघाडी करत अपक्षांनी मोठे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. रामदास कदम हेच गद्दार व खोटारडे- सूर्यकांत दळवी आपण कधीच पक्षाजवळ गद्दारी केली नाही रामदास कदम हेच गद्दार आहेत व खोटे बोलत आहेत, असा आरोप दळवी यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेमधून रामदास कदमही काँग्रेसमध्ये जाणार होते विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने गेले नाहीत, असा आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला. मला २०१४ साली विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांनीच पाडले, असाही आरोप दळवी यानी केला आहे. आपण घेतलेली राणे यांची भेट केवळ निवेदन देण्यासाठी होती. मात्र विरोधक चुकीचा अफवा पसरवून दिशाभूल करत असल्याचा आरोप दळवी यांनी केला. दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येईल. आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत. आघाडीचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर ठरल्याचे दळवी यांनी सांगितले


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3sjq4uE
https://ift.tt/3J4Jr0I

No comments

Powered by Blogger.