जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह नोंदणी पद्धतीने
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा रजिस्टर पद्धतीने विवाह पार पडला आहे.
आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशाच्या विवाहसोहळ्यात बँडबाजा, वरात असा कोणताही थाटमाट नव्हता. रजिस्टर पद्धतीने हा विवाह पार पडला. आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे.
मुलीच्या विवाहानंतर आव्हाड भावूक झाले. “आता मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं सांगताना त्यांना अश्रू आवरले नाहीत.
No comments