रामदास कदम यांच्या आरोपांवर उदय सामंत बोलले, 'मी तेव्हा राष्ट्रवादीत...'
सिंधुदुर्ग: कथित ऑडिओ क्लिपनंतर पक्षश्रेष्ठींची नाराजी आणि त्यानंतर रत्नागिरीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना कदम समर्थकांना डावलल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे नेते यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब आणि यांच्यावर आरोप केले. या आरोपांवर नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. मी जर शिवसेनेच्या विरोधात काम केले असेल आणि आदेश डावलला असेल तर, मी प्रायश्चित घेण्यास तयार आहे, असे सामंत म्हणाले. शिवसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कदम यांनी अनिल परब आणि उदय सामंत या दोन नेत्यांवर टीका केली. तसेच त्यांच्यावर अनेक आरोप केले. ऑडिओ क्लिपसंदर्भात बोलताना, ते म्हणाले की बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की किरीट सोमय्यांसोबत माझे काहीही बोलणे झाले नाही. शिवसेनेबाबत मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे स्पष्ट करतानाच कदम यांनी माझे राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखण्यात आला, असा आरोप अनिल परब यांच्यावर केला. त्यानंतर उदय सामंत यांच्याकडून मला पक्षनिष्ठा शिकण्याची गरज नाही, अशी टीका कदम यांनी केली होती. या टीकेनंतर उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात बोलताना उत्तर दिलं आहे. शिवसेना काय आहे हे मी अजिबात कुणालाही शिकवत नाही. मी जर शिवसेनेच्या विरोधात काम केले असेल आणि आदेश डावलला असेल तर प्रायश्चित घ्यायला मी तयार आहे, असे सामंत म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वी होतो, परंतु आता जर.... शिवसेना आघाडीचा प्रचार करण्यासाठी मी दापोलीत गेलो होतो. यांच्या आदेशानुसार आणि नेतृत्वात जी शिवसेना चालते, त्याचा प्रचार करण्यासाठी मी गेलो होतो. मी एक साधा शिवसैनिक आहे. शिवसेना काय हे मी कुणालाही शिकवत नाही, असे उत्तर सामंत यांनी कदम यांच्या टीकेला दिलं आहे. २०१४ नंतरच मी शिवसैनिक झालो आहे. त्याआधी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु मी जर शिवसेनेच्या विरोधात काम केले असेल, आदेश डावलला असेल तर मी प्रायश्चित घ्यायला तयार आहे, असेही सामंत म्हणाले. रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने केलेल्या टीकेवर बोलणे माझ्यासारख्यासाठी योग्य नाही. त्यांना माझे कान धरण्याचा पूर्ण हक्क आहे, असेही ते म्हणाले. अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत की उद्धव ठाकरे, या कदम यांच्या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाला माहीत आहे की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष काम करतो, असे सामंत म्हणाले.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/32bWRap
https://ift.tt/3E9wOOj
No comments