विन्हेरे येथे 15 विद्यार्थी, 2 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह
महाड : महाड तालुक्यातील विन्हेरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सायंकाळी हे वृत्त कळताच विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांनी सुरक्षा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सर्व संबंधित गावांतून तातडीने आशा सेविकांमार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नातेवाईकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती विन्हेरे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर व अँटीजेन तपासणीसाठी आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा असल्याचेही ते म्हणाले.न्यू इंग्लिश स्कूलमधे सुमारे 210 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच दहा शिक्षक येथे काम करीत आहेत.
पॉझिटीव्ह विद्यार्थी आणि शिक्षकांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला आरोग्यविभागाने दिला आहे.
No comments