दुचाकीवरून दोघे गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येत होते, ATS पथकाला संशय आल्यानंतर...
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील () हातखंबा तिठा येथे ९ जिवंत घेऊन रत्नागिरीत येणार्या वेंगुर्ल्याच्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरूण गावठी हातबॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. यावरून पथकाने सापळा रचून, ही कारवाई केली आहे. या प्रकरणी रामा सुरेश पालयेकर (वय २२, रा. वरचा वडखोल, वेंगुर्ला) आणि श्रीकृष्ण केशव हदळणकर ( वय २४, रा. वेंगुर्ला ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामीण पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून, रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या पथकाला पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्या दुचाकीवरील दोघांचे वर्तन संशयास्पद वाटले. या पथकाने त्यांची दुचाकी थांबवली. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ नऊ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3qzRs6H
https://ift.tt/3IcC8ma
No comments