रत्नागिरी जिल्हा हादरला; एकाच घरात तीन वृद्ध महिलांची हत्या

रत्नागिरी: जिल्ह्यातील वणौशी येथील तीन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिहेरी हत्याकांडामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. दागिन्यांसाठी हे खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता. याबाबत चंद्रकांत शंकर पाटणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वणौशी खोतवाडी येथे १४ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली होती. तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत गावात तळ ठोकून होते. ही हत्या ओळखीतल्याच व्यक्तींनी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. काहींची चौकशी करण्यात आली आहे, मात्र शनिवारी सांयकाळी उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती पोलीस तपासात समोर आली नव्हती. तीनही मृतदेह विच्छेदनासाठी रत्नागिरी येथे पाठवण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी उशिरा हे मृतदेह पोलीस पथकाच्या उपस्थितीत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्याकडील दागिने चोरल्यानंतर डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पैसे व दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने या महिलांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दापोली पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तीन महिलांच्या अंगावरील एक लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या महिला ज्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आल्या, त्या घराचा पुढील दरवाजा बंद होता. मागील दरवाजा मात्र, खुला होता. सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर जखमा होत्या. तर रक्तस्रावही बराच झाला होता. पार्वती पाटणे या दुसऱ्या खोलीमध्ये जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहात होत्या. त्या पार्वती यांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता. या बाबी विचारात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशिद करत आहेत.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3rnkzsT
https://ift.tt/3KjcKgr

No comments

Powered by Blogger.