जमीन नावावर करण्यासाठी पैशांची मागणी; .महसूल विभागाचा मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

खेड: रत्नागिरी जिल्हयात खेड तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याला १४ हजार रुपयांची घेताना बुधवारी १२ जानेवारी रोजी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सातबारावर नावाच्या नोंद घालण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन गोवळकर याने एका व्यक्तीकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. सचिन यशवंत गोवळकर (वय ४३, वर्षे, मंडळ अधिकारी, भरणे, ता. खेड,जि रत्नागिरी) असे अटक केलेल्या मंडलं अधिकाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार याने खेड तालुक्यात अपेडे येथे जमीन खरेदी केली होती. दरम्यान याप्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. खेड तालुक्यातील भरणे येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असून भरणे ग्रामपंचायत येथे असलेल्या महसूल विभागाच्या सर्कल ऑफीसमध्ये ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी येथील पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस हवादार नलावडे, पोलिस नाईक हुंबरे यांच्या पथकाने १४ हजार रुपयांची लाच स्विकारताना भरणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पकडले. या कारवाईत उपअधीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस नाईक दिपक आंबेकर, पोलीस नाईक योगेश हुंबरे व पोलीस शिपाई हेमंत पवार यांनी सहभाग घेतला. दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्यावतीने खासगी इसम, लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करीत असतील तर कृपया अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरीचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण ९८२३२३३०४४ किंवा ०२३५२/२२२८९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आले आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3FoHp8H
https://ift.tt/3qloW8r
No comments