Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकरांची वर्णी

सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपप्रणित सिद्धिविनायक पॅनेलच्या उमेदवारांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारील. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी () यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भाजपचेच अतुल काळसेकर () विजयी झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी हे नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पॅनेलकडून अध्यक्षपदासाठी उभे असलेले व्हीकटर डोन्ट्स आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार सुशांत नाईक पराभूत झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमळे यांनी दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. या निवडणुकीसाठी सकाळी १० ते ११.३० या वेळेत नामनिर्देशन पत्रांचे वितरण व ती स्वीकारणे, ११.३० ते ११.४० या वेळेत सादर नामनिर्देशन, पत्रांची छाननी झाली. दुपारी ११.४० ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी मुदत होती. दुपारी १२ ते १२.३० वाजता मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी बुधवारी भाजप जिल्ह्या कार्यकारिणीच्या बेठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोणीही दगाफटका करू नये असा सज्जड दम दिला आहे. अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत होती. या निवडणुकीत बँक संचालक मनीष दळवी याना मतदानाकरिता पोलिसांच्या सहकार्याने न्यायालयाकडे वकीलांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार परवानगी दिली होती.. त्यानुसार मनीष दळवी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संतोष परब हल्लाप्रकरण आणि नितेश राणे यांच्यावर भूमिगत होण्याची वेळ आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली होती. अखेर या अटीतटीच्या लढतीत नारायण राणे यांनी बाजी मारली होती. हा विजय राणे कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या निकालाने किमान सिंधुदुर्गात तरी राणेंचं नाणं खणखणीत वाजत असल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभव पत्करावा लागला होता.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3qoct3Y
https://ift.tt/3zRUOVs

No comments

Powered by Blogger.