दापोली, मंडणगड नगरपंचायतींच्या चार जागांसाठी निवडणूक, शिवसेनेच्या बंडखोरांनी भरले उमेदवारी अर्ज

रत्नागिरी: शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे गाजत असलेल्या दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी येत्या १८ तारखेला मतदान पार पडत आहे. यासाठी दापोली आणि मंडणगडमधील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही नगरपंचायतींमधील प्रत्येकी चार जागांसाठी एकूण ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी १९ उमेदवारी अर्ज , तर मंडणगडमधील चार जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये मोठ्याप्रमाणावर शिवसेनेतील बंडखोरांचा समावेश आहे. निवडणुकीत या बंडखोरीचा शिवसेनेला कितपत फटका बसणार, हे पाहावे लागेल. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी आमदार योगेश कदम यांना बाजुला ठेवत सगळी सुत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन आव्हान दिल्याने या चार प्रभागातील निवडणूक रंगतदार होणार आहे. दापोली व मधील १३ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणूक झाली आहे. उर्वरित ओबीसी आरक्षणासाठी चार प्रभागातील निवडणूक स्थगित ठेवण्यात आली होती. आता या चार प्रभागात सर्वसाधारण गटातून ही निवडणूक होणार आहे. आता ४ जागांसाठी १८ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून या सगळ्या निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारी रोजी होईल. 'मातोश्री'च्या आदेशाविरोधात कोकणातील शिवसैनिकांचं बंड दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रामदास कदम पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली होती. त्याजागी दापोली आणि मंडणगडमध्ये नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवर यामुळे मोठा रोष उत्पन्न झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दापोली, मंडणगड, खेड येथील जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या होत्या. विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या पाठिशी ठाम उभे राहून अन्याय सहन करणार नसून त्या विरोधात दाद मागू आशा स्वरुपाची भूमिका ग्रामीण भागातील शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतली होती. शिवसेनाप्रमुखांनी अन्यायविरुद्ध लढायला शिकवलंय: सुधीर कालेकर शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपूत्र विद्यमान आमदार योगेश कदम यांना पध्दतशीरपणे बाजूला ठेवत स्वबळाची तयारी केलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या स्थानिक पातळीवरील भावना समजूनच घेतल्या नाहीत नेत्यांमधील वैयक्तिक वाद असतील तर त्याची शिक्षा विद्यमान आमदार व पक्षाला कशासाठी?असा खडा सवालच बदलण्यात आलेले उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर यांनी उपस्थित केला होता. आमदार योगेश कदम उत्तम काम करत असून चांगले नेतृत्व या मतदारसंघात मिळाले आहे. मग काही लोक येऊन मिठाचा खडा कशासाठी टाकत आहेत? असा सवाल करत 'आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अन्याय विरुद्ध लढायला शिकवले आहे',आणि लढणाऱ्यांना न्याय नक्कीच मिळतो ज्यांनी भगवा उतरवला,पायाखाली घेतला तो भगवा आम्ही पुन्हा या दापोली विधानसभा क्षेत्रात फडकवला आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांनी आमच्या वाटेस न जाता पक्षनिष्ठेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत, असा सज्जड इशाराच सुधीर कालेकर यांनी दिला होता.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/31o0Osm
https://ift.tt/3eMD5VO

No comments

Powered by Blogger.